Friday, June 15, 2012

सप्तर्षी :)

सहवासाला झाली वर्षे सात
रुजली ती काळजाच्या आत
आता असला जरी साधंवरण भात
राहुं  आम्ही सतत सुखात 

Thursday, July 1, 2010

सहजच लिहिला काही तरी

काही थोडं, काही जास्त,
घ्यावी मजा मस्त,
आहे श्वास तोंपर्यंत
बघा वाटतंय का तुम्हाला हे रास्त

कशाला करावी चिंता...
होईल अजून गुंता

१ अधिक १ हे आहे माणसाचं गणित,
मला मिळालं काय नि तुला,
सगळा सारखंच आहे,
कधी कळेल तुला हे गुपित.

Monday, November 23, 2009

अहो सांगा की तुमचे विचार.

आज विचार करीत होतो की समजा कुणी मला विचारले,
काय हो, काय विचार आहे तुमचा?
तर मी ह्या विचित्र, पण तरी सुद्धा कुणी तरी वैचारिक संभाषण करण्याच्या उद्द्येश्याने विचारलेल्या अश्या ह्या प्रश्नाचे काय बरे मी उत्तर देईन ?

विचार करून करून शेवटी मला एक युक्ति सुचली, जर मी माझ्या विचारांचे डोक्यातलें काहुर ब्लॉग वर नोंदवले तर कोणी ना कोणी तरी म्हणेल, "काय हो काय विचार आहे तुमचा" ह्या प्रश्नाचे उत्तेर मी सहज देऊ शकतो।

तर मित्रानो अणि मैन्त्रिनिनो देखिल, अश्या उद्दाता हेतु नि मी ह्या ब्लॉग च श्री गणेश करीत आहे.

या बद्दल तुमचे काय मत आहे?